मराठी माणूस आणि उद्योजकता
एखाद्या समाजाला स्वतःच्याच भूमीवर आपल्या भाषेसाठी, आपल्या सामाजिक अस्मितेसाठी संघर्ष करावा लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आज मराठी समाजावर हीच वेळ ओढवली आहे. याला कारणीभूत कोण आहे? अर्थात आपणच! आपली अनाठायी सहिष्णु वागणूक, राजकारण्यांची स्वार्थी वृत्ती, समाजधुरीणांची उदासीनता अशी अनेक कारणे यामागे आहेत. या सगळ्या कारणांसोबतच आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक बाजूकडे होत असलेले …